Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादनिसर्गाचा ह्यास व जंगलतोडीमुळे देशात सुरूवातीच्याच पाऊसाने धारण केले रूद्ररूप!

निसर्गाचा ह्यास व जंगलतोडीमुळे देशात सुरूवातीच्याच पाऊसाने धारण केले रूद्ररूप!

प्रति, माननीय संपादकजी,
विषय:-निसर्गाचा ह्यास व जंगलतोडीमुळे देशात सुरूवातीच्याच पाऊसाने धारण केले रूद्ररूप!
पुर्वी देशात संततधारांचा पाऊस यायचा तेव्हा नदी नाले, तलाव तुडुंब भरायचे व नंतर पुरपरिस्थिती निर्माण व्हायची.परंतु सध्याच्या परिस्थितीत विकासाच्या नावाखाली खुलेआम निसर्गाची अवहेलना व कत्तल होत असुन मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे जंगलकटाई सुरू आहे.याचा दुष्परिणाम काय होईल याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे आज राज्यासह संपूर्ण देश पहिल्याच पावसाने जलमग्न झाल्याचे दिसून येते. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी व वित्तीय हाणी सुध्दा झाली आहे आणि होत. याचे गंभीर परिणाम देशातील नागरिकांना आज भोगावे लागत आहे.देशातील वायनाड,मुंबई, पिंपरी चिंचवड,गुजरात सह देशातील अन्य ठिकाणासह आज अर्धा देश पाण्याखाली असल्याचे दिसून येते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तीय व मानवीय हाणी मोठ्या झाली आहे आणि होत.दरड कोसळणे, कचऱ्याचे ढीगारे कोसळने,रस्त्यावरील खड्डे,पुल कोसळणे, विजेमुळे होणाऱ्या दुर्घटना, वाढते सिमेंट रोड,ड्रेनेज सिस्टीमचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर, गावात, शहरात साचल्याचे दिसून येते आणि त्याचे रूपांतर छोट्या- मोठ्या दुर्घटनामध्ये होतांना आपण पहातो.सरकार मोठ्या प्रमाणात शहरीकरणावर व औद्योगिकरणावर भर देत आहेत. परंतु त्याच प्रमाणात निसर्गाच्या संतुलनाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.आज सरकारने जंगलकटाई करून अनेक भुभाग शहरीकरणाने व औद्योगिकीकरणाने व्यापलेला आहे व याचेच प्रायश्चित्त मानव,पशुपक्षी आणि अनेक जीवजंतूंना भोगावे लागते.जंगलातील पशुपक्षांचे रहाण्याचे ठिकाण जवळपास उध्दवस्त झाले असुन ते शहराकडे धाव घेतांना दिसतात.सरकार सांगते आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करीत आहोत.परंतु हा सर्व प्रकार फक्त कागदावरच आहे ही बाब स्पष्ट होते आणि याचे जिवंत उदाहरण देशाच्या १४० कोटी जनते समोर आहे ,ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत अतिवृष्टीच्या अनेक कारणांमुळे ६३ लोकांचा बळी गेला आहे आणि देशाचा विचार केला तर शेकडोंच्या संख्येने जीवीत हाणी झाली असून पाळीव प्राण्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत गंभीर बाब आहे.अतीवृष्टीने देशाला व्यापले असुन संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.आज जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी उग्ररूप धारण करून नदी नाल्याना पुर येतो आणि हे संपूर्ण पाणी समुद्रात सामावते यामुळे दिवसेंदिवस समुद्राच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यामुळे समुद्र किनारपट्टीच्या भागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असल्याने जगातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे यात चीन, तैवान,जापान जलमग्न झाला असून या देशांना “बावी” चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात धोका वाढला असून त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याच प्रमाणात जगातील काही देश गर्मीची मार झेलत आहेत तर काही देश अतीवृष्टीची प्रहार सहन करीत आहेत आणि हा संपूर्ण प्रकार बदलत्या हवामानामुळे निर्माण झाला आहे.देशात एकीकडे पावसाचा तडाखा तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या हिंगोलीतील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्याला दिनांक ९ जुलै २०२६ ला पहाटे भूकंपाचे लागोपाठ तब्बल १४ मोठे धक्के बसले यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर हादरले भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत होता, सुमारे ४.६ रिक्टर स्केलचा धक्का बसल्याने पडझड झाली सुदैवाने जीवितहानी झाली नाही,यामुळे लातूरच्या भूकंपाच्या जून्या आठवणी ताज्या झाल्या.ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.असे सांगितले जाते की, २०१७ पासून हिंगोली जिल्ह्यात म्हणजे गेल्या ९ वर्षात आतापर्यंत भूकंपाचे ३५ धक्के बसले आहेत हा सर्व प्रकार निसर्गाच्या होत असलेल्या ह्यासामुळे होत आहे.हिंगोली जिल्ह्यात आलेल्या भुकंपाने ३० सप्टेंबर १९९३ च्या किल्लारी येथील भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या.यावरून स्पष्ट होते की, दिवसेंदिवस मानवाने निसर्गाची अवहेलना केल्यामुळे ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.सरकारने वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून वृक्षलागवडीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे व निसर्गाशी निगडीत होणारे धोके टाळले पाहिजे.जय हिंद!
रमेश कृष्णराव लांजेवार

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments