Wednesday, October 7, 2026
Homeऔरंगाबादपरतूरचे लालबहादूर शास्त्री विद्यालय खो-खो स्पर्धेत अजिंक्य

परतूरचे लालबहादूर शास्त्री विद्यालय खो-खो स्पर्धेत अजिंक्य

परतूरचे लालबहादूर शास्त्री विद्यालय खो-खो स्पर्धेत अजिंक्य 

परतूर :- तालुकास्तरीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या संघाने अजिंक्य पद पटकावाले.शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सोमवारी (दि. 5) तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये शहरासह तालुक्यातील शाळांचे संघ सामिल झाले होते. मुलांच्या 17 वर्षे वयोगटात लालबहादूर शास्त्री विद्यालय आष्टी व लालबहादूर शास्त्री विद्यालय परतूर यांच्यात अंतिम सामना झाला.या सामन्यात परतूर येथील संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर लक्षणीय विजय मिळविला. तालुकास्तरावर विजयी झाल्याने या संघाची निवड आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.विजयी संघाला क्रीडाशिक्षक सुनील राठोड, श्रीमती टर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments