Monday, October 5, 2026
Homeऔरंगाबादमाळेगाव शिवारातील विहिरीतून पाणबुडी मोटार चोरी करणाऱ्या दोन आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत; पिशोर...

माळेगाव शिवारातील विहिरीतून पाणबुडी मोटार चोरी करणाऱ्या दोन आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत; पिशोर पोलिसांची यशस्वी कारवाई

माळेगाव शिवारातील विहिरीतून पाणबुडी मोटार चोरी करणाऱ्या दोन आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत; पिशोर पोलिसांची यशस्वी कारवाई

कन्नड/प्रतिनिधी/ तालुक्यातील पिशोर पोलीसाची १५/८/२०२६ रोजी माळेगाव ठोकळ, ता. कन्नड येथील शेतकरी कैलास भागीनाथ ठोकळ यांनी पोलीस ठाणे पिशोर येथे तक्रार दिली होती की, माळेगाव शिवारातील शेतातील विहीर क्र. ४४ मधून शेतीसाठी पाणी देण्याकरिता बसविलेली मेघा कंपनीची ५ HP पाणबुडी मोटार, किंमत ₹२०,००/- अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे.
सदर तक्रारीवरून पोलीस ठाणे पिशोर येथे कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
     गुन्ह्याचा सखोल तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे १) हरीदास नारायण ठोकळ, वय ३६ वर्षे, २) भिमराव सोमिनाथ अहिरे, वय २८ वर्षे, दोन्ही रा. माळेगाव ठोकळ यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली मेघा कंपनीची 5 HP पाणबुडी मोटार, किंमत ₹२०,०००/- हस्तगत करण्यात आली आहे.
       सदर कारवाई मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) व मा. श्रीमती अपरिजिता अनिहोत्री, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे पिशोर, पोलीस उपनिरीक्षक शाम गवळी, पोलीस हवालदार दत्तू लोखंडे, पोलीस अंमलदार विजय भोटकर, पोलीस कॉन्स्टेबल ३६६ मस्के, पोलीस कॉन्स्टेबल ४०९ खंबाट व होमगार्ड नितीन शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments