आम आदमी पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक दत्तूजी पवार यांच्या मातोश्री लिलाबाई आसाराम पवार यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शोकसंवेदना
छत्रपती संभाजीनगर :- आम आदमी पार्टीचे (आप) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे समन्वयक दत्तूजी आसाराम पवार यांच्या मातोश्री लिलाबाई आसाराम पवार (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने रात्री १:०० वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय आणि सामाजिक स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. लिलाबाई पवार यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील प्रताप नगर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण प्रसंगी आप परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि दुःखात सहसंवेदना व्यक्त केल्या.
यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव सुग्रीवजी मुंडे, राज्य सचिव वैजनाथराव राठोड, जिल्हा अध्यक्षा मेघाताई राईकवार, शहर अध्यक्ष सलाउदिन नेहरी, शहर सचिव संजय नागरे, नेते प्रकाशराव जाधव यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील विविध घटकांतील मंडळी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परमात्म्या ईश्वराने दिवंगत मातोश्री लिलाबाई पवार यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना उपस्थितांनी केली.
स्व. लिलाबाई यांच्या मागे आपचे जिल्हा समन्वयक दत्तू आसाराम पवार आणि संतोष आसाराम पवार ही दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल आप परिवाराकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
