टाकळी येथील शिवेश्वर विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर येथील शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी (अंतुर) मा. प्राचार्य संदीप पाटील मा. जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री विलास मोरे पर्यवेक्षक श्री राजेंद्र गायकवाड,प्रा अरविंद जंजाळ यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले .शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा या विचारावर आणि लालबहादूर शास्त्री यांच्या “जय जवान ‘जय किसान “या घोषणेवर आधारित भाषण सादर केली. शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनात दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्याचा वेध घेतल्या. विजय पुरी सर यांनी आजच्या पिढीने त्यांच्या प्रामाणिकपणाचा, देश प्रेमाचा व साधेपणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मोरे सर यांनी महात्मा गांधींचे जीवन किती साधेपणाचे होते पण विचार मात्र उच्च होते हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सोळंके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र शेवाळे यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सोपान गोरे संतोष सुस्ते, प्रमोद वैराळ , राम पवार, सुभाष पाटील ,गणेश देवकर ,रामेश्वर ढेपले, सोपान गीते ,विजय गोरे ,अर्जुन चव्हाण ,जगदी दाभाडे , संतोष सौदागर, रत्नाकर काथार ,ज्योती करपे, लता विधाटे, कल्पना खामगावकर, सचिन जाधव, अमोल पंडित सुरज पवार ,बाजीराव सपकाळ कौतिक सपकाळ, सुधाकर भुजंग ,योगेश मगर आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
