कट-कट गेट इस्लाम दरवाजा येथे मोफत हिजामा शिबिराला तुफान प्रतिसाद
१५० हून अधिक नागरिकांचा सहभाग; ईद मिलादुन्नबीनिमित्त अशफाक जमील खान यांचा कौतुकास्पद पुढाकार.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरात आरोग्याचा एक मोठा आणि यशस्वी टप्पा पार पडला आहे. फैज-ए-मोहम्मद शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आणि युवा समाजसेवक अशफाक जमील खान यांच्या दमदार पुढाकाराने गुरुवार, २० ऑगस्ट रोजी कट-कट गेट येथील इस्लाम दरवाजा परिसरात आयोजित मेगा मोफत हिजामा शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १५० हून अधिक नागरिकांनी हिजामा सेवेचा लाभ घेत आरोग्यसेवेचा घेतलासा घेतला.
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात नागरिकांना कपिंग थेरपीची (हिजामा) मोफत सेवा देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
तज्ज्ञांचे बहुमूल्य मार्गदर्शन
या शिबिरात नामांकित तज्ज्ञांनी नागरिकांना सेवा दिली. यामध्ये:
-
हिजामा तज्ज्ञ अरबाज खान
-
हिजामा तज्ज्ञ कोनैन कादरी
-
डॉ. तौसेफ (BHMS)
-
कपिंग थेरपी तज्ज्ञ शफीक खान
यांनी उपस्थितांची आरोग्य तपासणी करून शरीरदुखी, ताणतणाव आणि इतर आजारांवर मोफत मार्गदर्शन केले. हिजामा उपचार करण्यापूर्वी पात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे किती गरजेचे आहे, हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
“गरजूंच्या सेवेसाठी अशफाक जमील खान यांचे कार्य कौतुकास्पद”- साजिद मौलाना
यावेळी मार्गदर्शन करताना सर्वपक्षीय मुस्लिम आघाडीचे संस्थापक अध्यक्ष साजिद मौलाना यांनी आक्रमक भूमिका मांडत सांगितले की, प्रत्येक वॉर्ड आणि गरीब वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या आरोग्याचा पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे आहे. अशफाक जमील खान ज्या प्रकारे हा सामाजिक वसा पुढे नेत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद असून त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या यशस्वी शिबिरासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. यामध्ये अशफाक जमील खान, साजिद मौलाना, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अशरफ पठाण, पदवीधर विभागाचे महाराष्ट्र सरचिटणीस शेख मुक्रम, शहराध्यक्ष शेख इरफान, मोहम्मद शोएब, वाजेद अस्लम, शाहेद अस्लम, शाहेद खान, सैय्यद बाबू, शफीक पटेल यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
‘हिजामा ही सुन्नतही आणि उत्तम उपचारपद्धतीही’ हा संदेश देत मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर, भविष्यातही अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचा ठाम निर्धार अशफाक जमील खान यांनी व्यक्त केला आहे.
