जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी येथील शाळेची दुरावस्था
दैनिक आताच एक्स्प्रेस
हादगाव/प्रतिनिधी/ परतूर तालुक्यातील मौजे फुलवाडी येथील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था फारचं बिकट झाली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना बसनयाकरता वर्ग खोली पण व्यवस्थित नाहीत मुला मुलींना जीव मुठीत घेऊन नाईलाजी दैनंदिन शाळेत जावे लागत आहे यासारख्या कोणत्याही परिस्थितीत विषयावर चर्चा केली जात नाही तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तसेच सदस्य यांनी ग्रामसेवक व गावातील सरपंचांना वारंवार सांगूनही शाळेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर आले आहे प्रति वर्ष वार्षिक शाळेला 33% फंड उपलब्ध असतानाही कुठलाही एकही वापरल्याचे दिसून आले नाही शाळेतील मुलांना शाळेत बसण्याकरता वर्गामध्ये मोठ मोठाले खड्डे पायास मिळत आहेत खेळण्या बागडण्यासाठी चांगल्या दर्जाचे ग्राउंड ही खेळ साहित्य उपलब्ध नाही शाळेला कुठेही प्रकाराचे रंगरंगोटी दिले नाही शाळेतील परिवर्ग व्यवस्थित राहिला नाही शाळेतील मुलांना बसण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो की आपल्या शाळेला पाणी फिल्टर असून पाणी मिळत नाही व बसण्याची कोणतेही सुविधा नाही गावातील पालक वर्ग यांनी मागण्या केल्या.
