Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादजैन  टॅग तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन

जैन  टॅग तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन

 

जैन  टॅग तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती सभाजीनगर :- विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे आणि शिक्षणासोबत मनोरंजनाचा सुंदर संगम घडवून आणण्याच्या उद्देशाने जैन टॅग तर्फे ७ जुलै रोजी दोन शाळांमध्ये मोफत जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नवजीवन स्कूल येथे सकाळी १०:३० वाजता आणि पी. यू. जैन स्कूल येथे दुपारी २:३० वाजता आकर्षक जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ शेकडो विद्यार्थी घेणार असून, त्यांना आनंदासोबत प्रेरणादायी अनुभवही मिळणार आहे. यावेळी  जैन टॅग च्या अध्यक्षा सौ. जयश्री लोहाडे म्हणाल्या,”मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. शिक्षणासोबत आनंद, सर्जनशीलता आणि सकारात्मक विचारांची जोड मिळावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे  या कार्यक्रमासाठी प्रोजेक्ट चेअरमन रचना पहाडे कीर्ती पाटनी मिताली काला सपना पाटनी सारीका बडजाते दिपाली पाडे यानी समाजहितासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा जैन टॅग चा संकल्प केला आहे.”
      समाजोपयोगी, शैक्षणिक आणि संस्कारक्षम उपक्रम सातत्याने राबवत असून, भविष्यातही विद्यार्थी, महिला आणि समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments