Sunday, June 21, 2026
Homeऔरंगाबादहजरत दावल शहा मालीक बाबा यांचा ऊरुस

हजरत दावल शहा मालीक बाबा यांचा ऊरुस

हजरत दावल शहा मालीक बाबा यांचा ऊरुस

जालना :- धुम… धुम… हजरत दावल शहा मालीक बाबा यांचा भव्य- दिव्य ऊरुस सोमवार दि,23 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. यानिमित्त येथून जवळच असलेल्या घाणेवाडी गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर मंगळवार दि.24 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता आई भवानीचे सोंग हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे, आ. अर्जुनराव खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, प्रशांत वाढेकर, विष्णू पाचफुले, विजूभाऊ लहाने, सुधाकर वाढेकर, सुधाकर निकाळजे आदींची उपस्थिती राहणार असून रात्री भव्य भजन व कव्वालीचा कार्यक्रम पार पडणार असून यावेळी पंचक्रोशील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments