Thursday, June 25, 2026
Homeऔरंगाबादघृष्णेश्वर मंदिर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत; महावितरणच्या वायरमनचे कौतुक

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत; महावितरणच्या वायरमनचे कौतुक

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत; महावितरणच्या वायरमनचे कौतुक

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील ​वेरूळ येथील  बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर परिसर आणि वेरूळ गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण झाली होती.अखेर महावितरणच्या वायरमन कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत हा तांत्रिक बिघाड शोधून काढला आणि वीज पुरवठा पूर्ववत केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, सब स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या नदीकाठच्या भागात विद्युत पोलावर तारांवर वेली मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.या वेलींनी तारांना वेढल्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होऊन वीज पुरवठा खंडित होत होता. नदीकाठचा परिसर असल्याने आजवर हा बिघाड नेमका कुठे आहे, हे शोधण्यात अडचणी येत होत्या. ​मात्र, आज महावितरण कंपनीच्या वेरूळ येथील तत्पर कर्मचाऱ्यांनी   जाऊन खांबावर वाढलेली वेल शोधून काढली. महावितरणचे वायरमन शेख इरफान, रफिक शहा, लाईक पठाण आदी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता खांबावर वाढलेली वेल अत्यंत कौशल्याने हटवली आणि ‘फॉल्ट’ दुरुस्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments