Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादघाटशेंद्रा येथील लक्ष्मण कचरू लंभे यांना हवालदार पदावरून नायब सुभेदार पदावर पदोन्नती...

घाटशेंद्रा येथील लक्ष्मण कचरू लंभे यांना हवालदार पदावरून नायब सुभेदार पदावर पदोन्नती मिळाली

घाटशेंद्रा येथील लक्ष्मण कचरू लंभे यांना हवालदार पदावरून नायब सुभेदार पदावर पदोन्नती मिळाली

कन्नड/प्रतिनिधी/ सुनिल निकम कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील वीस पंचवीस जण देश सेवेसाठी आहेत पण गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला लक्ष्मण कचरू लंभे यांची चोविस वर्ष सेवेत आहेत लंभे लक्ष्मण कचरू यांना भारतीय सैन्यात हवालदार पदावरून नायब सुभेदार पदावर पदोन्नती मिळाली सध्या आपण RTS & Depot, सहारनपूर येथे कर्तव्य बजावत आहात. आपल्या अथक परिश्रम, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेप्रती असलेल्या समर्पणाची ही पदोन्नती म्हणजे योग्य पावती आहे. हवालदार ते नायब सुभेदार हा प्रवास केवळ पदाचा बदल नसून, तो नेतृत्व, जबाबदारी आणि विश्वासाचा गौरवशाली टप्पा आहे. आपल्या या यशाने कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी आणि संपूर्ण युनिटचा अभिमान वाढवला आहे. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सेवेत आणखी यश, सन्मान व प्रगती देवो, हीच सदिच्छा. “खांद्यावरील नवीन स्टार हा केवळ सन्मान नाही, तर देशसेवेची अधिक मोठी जबाबदारी आहे. तीही आपण यशस्वीपणे पार पाडाल, याची पूर्ण खात्री आहे.असे त्यानी सांगीतले   त्याचे सर्व स्तरातून तालुक्यातून व परिसरातून कौतुक होत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments