Friday, September 25, 2026
Homeऔरंगाबादगटविकास अधिकारी यांच्याकडे पेवर ब्लॉक जाणीवपूर्वक काढणाऱ्यावर कारवाईची मागणी

गटविकास अधिकारी यांच्याकडे पेवर ब्लॉक जाणीवपूर्वक काढणाऱ्यावर कारवाईची मागणी

गटविकास अधिकारी यांच्याकडे पेवर ब्लॉक जाणीवपूर्वक काढणाऱ्यावर कारवाईची मागणी

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गटविकास अधिकारी पंचायत समिती  गंगापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की गणेश पांडुरंग दाणे यांनी गंगापूर तालुक्यातील जांभळा येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बसवण्यात आलेले पेवर ब्लॉक जाणीवपूर्वक व हेतू पुरस्पर काढून, कामगारांना अर्वाचे भाषेत शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल  योगेश दाने, सोमनाथ बनकर, यांनी तक्रार दाखल केले आहे तसेच दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मौजे जांभळा ग्रामपंचायत अंतर्गत व दलित वस्ती सुधार योजनेतून दलित वस्तीत अंदाजे पाच लक्ष रुपयाचे पेवर ब्लॉक बसवण्याचे काम  सरपंच व ग्रामसेवक यांच्या देखरेखीखाली सुरू होते, सर्व काम सुरळीत चालू असताना सरपंच व ग्रामसेवक काम झाल्यावर आपापल्या घरी गेले असताना गणेश दाणे यांचा जागेचा ग्रामपंचायतला कोणताही रेकॉर्ड नाही तरीसुद्धा त्यांनी गल्लीत बसवलेले पेव्हर ब्लॉक काढून टाकले व कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे.  गणेश दाणे यांचे नमुना नंबर आठ नुसार त्यांची जागा मोजून बाकीच्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्याची ग्रामपंचायत कार्यालयास आदेश देण्यात यावे आणि जे पेव्हर ब्लॉक बसवले त्या पेवर ब्लॉक झालेले नुकसान गणेश दाणे, यांचे बंधू दिनेश दाणे व यांच्या परिवाराकडून वसूल करून त्यांच्यावर नियमानुसार शासकीय कामात अडथळा व शासकीय संपत्तीचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे. लवकरात लवकर गणेश दाने यांचे जागेची मोजणी करून त्यांचा रेकॉर्ड तपासण्यात येऊन राहिलेले काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर योगेश दाने, सोमनाथ बनकर, यांच्या स्वाक्षऱ्या आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments