Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्री शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आले

फुलंब्री शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आले

फुलंब्री शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आले

फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहरात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आले, दिनांक २६ ऑगस्ट रोजी फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मोहम्मद पैगंबर सल्ललाहुअलैह व सल्लम यांच्या ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात लहान लहान मुला, मुलींनी पैगंबर यांच्या जिवनातील त्यांनी जगलेल्या जिवनशैलीवरील घटनेची माहिती सादर केली, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अब्दुल वाजिद कादरी यांनी पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांनी त्यांच्या आयुष्यात शांतता, सद्भावना, प्रेम, करूणा आणि सामाजिक एकात्मतेच्या संदेश दिला, मोहम्मद सल्ललाहुअलैह यांनी मुलींची हत्या करू नये मुलींना सुध्दा जगण्याचा अधिकार आहे हे त्या वेळी सर्वांना सांगितले, ईश्वर अल्लाह हे एकच आहे, आपण सर्व एकाच आई वडीलांची संतांना आहोत म्हणत आपापसात भांडू नये, मुलीला मुला प्रमाणे समान वागणूक व वाटणी दिली पाहिजे, असा संदेश दिला, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल वाजिद कादरी, नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, नायब तहसीलदार संजिव राऊत, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, मुफ्ती अजहर सय्यद, मुफ्ती जरिफ काझी, नगरसेवक आसेफ पटेल, वाल्मीक जाधव, जावेद खान,उमेश दुतोंडे, संजय मोरे, भगवान गंगावणे, रमेश गंगावणे, सांडू हापत, सुरज सोनवणे, रज्जू शेठ, एड, निसार कादरी, इमरान खान, ईसमइल खान, अकबर शहा, शेख जमाल, रियाज शहा, रफीक सय्यद, शेख आसेफ, कदीर पठाण, फेरोज पठाण, गजनफर शेख, सद्दाम शेख, यांच्या सहा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments