डॉ अकील खान यांना ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार
सर्व स्तरातुन कौतुक,
फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील सुप्रसिद्ध डॉ. अकील खान
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील सुप्रसिद्ध डॉ. अकील खान यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए मार्फत अतिशय प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026 मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह औरंगाबाद येथे देण्यात आला.
ॲक्युपंक्चरिस्ट यांच्या कार्याचा हा सन्मान होता या पुरस्काराला महाराष्ट्रातील ॲक्युपंक्चर थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये मराठी सिने कलावंत डॉ सुयोग गोऱ्हे ,ॲड.नाझेर काझी साहेब प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ॲड. दत्तात्रय जाधवर, ॲड नागेश सोनुने,
तर मंचावर प्रमुख उपस्थितीमध्ये चेअरमन डॉ सतीश कराळे,डॉ नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे,
डॉ अभिजित कवठकर, श्री प्रशांत सावंत, सौ दिशा चव्हाण,श्री विजय नवल पाटील, श्री तुषार वाघूळदे,डॉ राजेंद्र गोऱ्हे
व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.
अकील खान यांना हा कार्याचा महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून अकील खान यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.