Homeऔरंगाबादआमरण उपोषणाचा सातवा दिवस; प्रशासनाची कुंभकर्णी झोप कायम!

आमरण उपोषणाचा सातवा दिवस; प्रशासनाची कुंभकर्णी झोप कायम!

आमरण उपोषणाचा सातवा दिवस; प्रशासनाची कुंभकर्णी झोप कायम!

उद्धवसिंग साहेबशिंग पवार यांची प्रकृती अस्वस्थ; ठोस कार्यवाहीच्या प्रतीक्षेत उपोषण सुरूच
 अंबड/प्रतिनिधी/ घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दानपात्र जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. उपोषणकर्ते उद्धवसिंग साहेबशिंग पवार यांची प्रकृती अस्वस्थ असूनही मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या आंदोलनादरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि तलाठी यांनी उपोषणस्थळी भेट दिली होती. मात्र, या भेटीनंतरही शाळेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याने उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
       शाळेच्या दानपात्र जमिनीवरील अतिक्रमण हटवून जमीन शाळेच्या ताब्यात द्यावी, संबंधित जागेला कायमस्वरूपी तारकुंपण किंवा संरक्षक भिंत उभारावी आणि सार्वजनिक शैक्षणिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करूनही प्रश्न सुटला नसल्याने आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आंदोलनाचा सातवा दिवस उजाडला असतानाही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेच्या जमिनीचा प्रश्न कधी सुटणार आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर ठोस कार्यवाही कधी होणार? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments