अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तक्रार केल्यास ‘जेसीबी’ घालण्याची धमकी, सोनखेड्यातील घटना
तरुणावर पोक्सो अंतर्गत खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणे, रात्री घराच्या खिडकीतून हाक मारून पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकणे तसेच पोलिसांत तक्रार केल्यास तिच्या आई-वडिलांच्या अंगावर जेसीबी घालण्याची जीवघेणी धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात पोक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
