Homeऔरंगाबादमराठवाडा पदवीधर मतदार रॅली २०२६ आष्टी येथे संपन्न आष्टी येथे मराठवाडा पदवीधर...

मराठवाडा पदवीधर मतदार रॅली २०२६ आष्टी येथे संपन्न आष्टी येथे मराठवाडा पदवीधर मतदार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाडा पदवीधर मतदार रॅली २०२६ आष्टी येथे संपन्न

आष्टी येथे मराठवाडा पदवीधर मतदार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टी/प्रतिनिधी/ मराठवाडा पदवीधर मतदार रॅली २०२६ ही आष्टी येथे संपन्न झाली. या रॅलीच्या माध्यमातून पदवीधर मतदारांमध्ये जनजागृती करणे, पदवीधरांचे प्रश्न मांडणे तसेच त्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
      या रॅलीमध्ये पदवीधर मतदार, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. पदवीधरांच्या हक्कांचे संरक्षण, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
       लोकशाही प्रक्रियेत पदवीधर मतदारांची भूमिका महत्त्वाची असून, मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच आष्टीचे माजी सरपंच अमोल जोशी अजिंक्य पांचाळ यांच्या नेतृत्व खाली रोजी सायंकाळी आष्टी शहरात रॅली संघटनेचे पतसंस्था चालना रॅली काढण्यात आली होती सदर रॅलीमध्ये शंभर ते दीडशे असे जन समुदाय असून बंदोबस्त करिता पोलीस ठाणे आष्टी चे प्रभारी अधिकारी श्री सुरवशे साहेब गोपनीय शाखेचे अंमलदार ढाकणे साहेब टाऊन बिट जमादार बादाडे साहेब पांढरे साहेब असे बंदोबस्त करिता मोठ्या संख्येने हजर होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments