Monday, October 5, 2026
Homeऔरंगाबादसमाजाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनानुभवाचा उपयोग करून घ्यावा

समाजाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनानुभवाचा उपयोग करून घ्यावा

समाजाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनानुभवाचा उपयोग करून घ्यावा

पाचोड/प्रतिनिधी/ समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या प्रदीर्घ जीवनानुभवाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन जालना येथील ज्येष्ठ नागरिक अरुण वाघ यांनी केले.
    शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्येष्ठ नागरिक दिन ” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण वाघ उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते. मार्गदर्शन करताना अरुण वाघ म्हणाले की, पूर्वी समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्यांचा सहवास, आधार व सन्मान मिळत असे. मात्र, सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात विविध समस्या निर्माण होत आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांकडे केवळ वयस्क व्यक्ती म्हणून न पाहता त्यांच्या अनुभवसंपन्न ज्ञानाचा समाजाच्या उभारणीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला संस्कार, मार्गदर्शन आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसत आहे. ही बाब चिंतन करण्यासारखी असून, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कुटुंबातच प्रेम, आधार आणि सन्मानाचे वातावरण मिळेल, यासाठी समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे जीवन अधिक आनंदी व सुरक्षित कसे करता येईल, यावर समाजाने विचारमंथन करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्तम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन यांनी केले, तर आभार गजेंद्र राठोड या विद्यार्थ्याने मानले.यावेळी डॉ. संतोष चव्हाण, डॉ. विलास महाजन, डॉ. सुभाष पोटभरे, डॉ. तुकाराम गावंडे, डॉ. संदीप सातोणकर, प्रा. विनोद कांबळे, प्रा. नितीन चित्ते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments