लासूर स्टेशन परिसरात १८ दिवसापासून नळा निर्जळी,पाण्याचा ठणठणाट ग्रामपंचायतीचा दुर्लक्ष….
आ.प्रशांत बंब यांनी महिलांच्या डोक्यावरील उतरावलेला हंडा पुन्हा डोक्यावर येणार ?
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासुर स्टेशन येथील नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असून गेल्या १८ दिवसांपासून सावंगी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वार्डामध्ये पाण्याचा थेंबही नाही त्यामुळे महिला भगिनी आक्रमक झाल्या असून येत्या दोन दिवसात पाणी समस्या मिटली नाही तर ग्रामपंचायतवर धडक हंडामोर्चा काढण्याची तयारी महिला वर्गाने केली आहे. दरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी महिलांच्या डोक्यावरील उतरावलेला हंडा पुन्हा डोक्यावर येणार की काय असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होत आहे तसेच पुन्हा टँकरनें ५ रुपयाला हंडाभर पाणी विकत घ्यावे लागेल कीं काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान धरण अगदी डोळ्यांसमोर असताना, केवळ प्रशासकीय अनास्था आणि नियोजनाअभावी गावकऱ्यांच्या नळाला तब्बल १८ दिवसांपासून थेंबही पाणी आलेले नाही. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अत्यंत दयनीय अवस्था सध्या ग्रामस्थांची झाली असून, पाण्यासाठी तीव्र संताप व्यक्त होत आहे.