Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादबिडकीन शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; जुलूसमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

बिडकीन शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; जुलूसमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

बिडकीन शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; जुलूसमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

पैठण/प्रतिनिधि/ ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने बुधवारी (दि. २६) बिडकीन शहरात धार्मिक व सामाजिक उपक्रमांसह उत्साहपूर्ण वातावरणात भव्य जुलूस मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात धार्मिक श्रद्धेसोबतच हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
     सकाळी ८ वाजता टकार मोहल्ला येथून मखतबचे तलबा, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच विविध समाजबांधवांच्या उपस्थितीत जुलूसला सुरुवात झाली. इनामदार गल्ली, सादत चौक, सोनवणे गल्ली, हवालदार गल्ली, बागवान मोहल्ला, मारवाडी गल्ली, बसस्टँड, शेकटा फाटा, तथागत नगर मार्गे जुलूस पुन्हा टकार मोहल्ला येथे पोहोचला. त्यानंतर आशुरखाना येथे तबर्रुक वाटप व नियाजचा कार्यक्रम घेऊन जुलूसचा समारोप करण्यात आला.
     जुलूसच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांकडून गोडप्रसाद व शरबताचे वाटप करण्यात आले. मालेगाव येथील नातख्वान मुजम्मील साबरी तसेच नाशिक येथील शैबाज रजा यांनी नात सादरीकरणातून जुलूसमध्ये विशेष रंगत आणली.
      यावेळी शहरातील विविध मशिदींचे इमाम, मौलाना नाजेरोद्दीन, हादिन शहा, जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब टेके, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते नन्हेखॉ पठाण, पंचायत समिती सदस्य लतीफ कुरैशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तमिजोद्दीन इनामदार, विकास गोर्डे, अली इनामदार, आजम इनामदार, इलियास शेख, कौसर मिर्झा, नसीर इनामदार, अशपाक शेख, आजम शेख, आशा इनामदार, अपसर शेख, फेरोज शेख, मुक्तार शेख, मोसीन शेख, लियाकत पठाण, शब्बीर इनामदार, सद्दाम इनामदार यांच्यासह बिडकीन व पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments