Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादनवसाला पावणार पंचमुखी महादेव मंदिर

नवसाला पावणार पंचमुखी महादेव मंदिर

नवसाला पावणार पंचमुखी महादेव मंदिर

टेंभुर्णी/प्रतिनिधी/ जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील प्रसिद्ध पंचमुखी महादेव मंदिर पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून येथील प्रसिद्ध पंचमुखी महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू रहाते. श्रावण मासानिमित्त मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती आणि भजनांचे आयोजन करण्यात येत असून, यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय होतो . आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार असुन आज विशेष शिवमुठ अर्पण करतात त्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येथे . भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने विशेष नियोजन केले जाते दररोज सकाळी आणि सायंकाळी मंदिरात सुश्राव्य महाआरती होत आहे. स्थानिक व परिसरातील नामवंत भजन मंडळांद्वारे रोज रात्री हरीनामाचा गजर आणि भजनांचे कार्यक्रम रंगत आहेत.शिवलिंगाची श्रावण सोमवारच्या दिवशी पंचमुखी महादेवाला रुद्रामिषेक आणि विशेष महापूजा बांधण्यात येत आहे दर्शनासाठी आणि भजनाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments