Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादरक्षाबंधनाचा उत्साह: टेंभुर्णीतील 'केवट राखी दुकान' येथे ५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंतच्या राख्या...

रक्षाबंधनाचा उत्साह: टेंभुर्णीतील ‘केवट राखी दुकान’ येथे ५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंतच्या राख्या दाखल; खरेदीसाठी महिलांची गर्दी

रक्षाबंधनाचा उत्साह: टेंभुर्णीतील ‘केवट राखी दुकान’ येथे ५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंतच्या राख्या दाखल; खरेदीसाठी महिलांची गर्दी
टेंभुर्णी/प्रतिनिधी/ येत्या शुक्रवारी येत असलेल्या भाऊ-बहिणीच्या पवित्र अशा रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी बाजारपेठ पूर्णपणे सज्ज झाली आहे. बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक आणि रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी आल्या असून, येथील प्रसिद्ध ‘केवट राखी दुकान’ येथे आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी महिला व भगिनींची मोठी गर्दी होताना दिसत आहे.यावर्षी ‘केवट राखी दुकान’ मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाचा विचार करून ५ रुपयांच्या साध्या धाग्यापासून ते अगदी १५० रुपयांपर्यंतच्या फॅन्सी आणि कलाकुसरीच्या राख्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये बालकांसाठी खास छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडरमॅन आणि विविध लाईट्स असलेल्या राख्या लहान मुलांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. तर मोठ्या भावांसाठी रेशमी धागे, जरीच्या राख्या, चंदन, रुद्राक्ष, आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. सर्व दरांमध्ये उत्तम राख्या उपलब्ध असल्याने ग्राहक आपापल्या आवडीनुसार खरेदी करत आहेत.ग्राहकांचे समाधान हीच आमची पावती: दुकानदार केवटबाजारपेठेतील सद्यस्थिती आणि ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल बोलताना ‘केवट राखी दुकान’चे मालक म्हणाले की, “यावर्षी आम्ही ग्राहकांसाठी अत्यंत माफक दरात म्हणजेच ५ रुपयांपासून अगदी १५० रुपयांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या राख्या उपलब्ध केल्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments