Thursday, August 27, 2026
HomeUncategorizedश्रावण मासानिमित्त भोलेश्वर कॉलनीतर्फे भव्य पायी कावड यात्रा उत्साहात संपन्न

श्रावण मासानिमित्त भोलेश्वर कॉलनीतर्फे भव्य पायी कावड यात्रा उत्साहात संपन्न

श्रावण मासानिमित्त भोलेश्वर कॉलनीतर्फे भव्य पायी कावड यात्रा उत्साहात संपन्न

भक्तिमय वातावरणात शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग माजी आमदार उदयसिंग भाऊ राजपूत आणि धर्मवीर उद्योजक श्रीं.मनोजभाऊ पवार व उद्योजिका सौ.उर्मिलाताई मनोज पवार यांची विशेष उपस्थिती
कन्नड/प्रतिनिधी/ श्रावण मासानिमित्त सालाबादप्रमाणे भोलेश्वर कॉलनीच्या वतीने भव्य पायी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. भोलेश्वर महादेव मंदिर, हिवरखेडा रोड येथून सुरू झालेली ही कावड यात्रा श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर, वेरूळ येथे भक्तिभावाने प्रस्थान करण्यात आली. या यात्रेला शिवभक्तांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी धर्मवीर उद्योजक श्री. मनोजभाऊ पवार व उद्योजिका सौ. उर्मिलाताई मनोज पवार व ह.भ.प. श्री विष्णु महाराज काळे विश्वमाई संस्थान यांनी उपस्थित राहून कावड यात्रेत सहभागी होत विधिवत पूजा-अर्चना केली. तसेच भक्तिमय वातावरणात झालेल्या नृत्यात सहभागी होत शिवभक्तांचा उत्साह वाढविला. त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साहपूर्ण झाला.
कावड यात्रेच्या निमित्ताने राजुरेश्वर लॉन्स येथे शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. हर हर महादेव‘बम बम भोले’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले आयोजनासाठी अथक परिश्रम
भव्य धार्मिक कावड यात्रेच्या  विनोदभाऊ साबळे अण्णा पवार, विजय भोसले, दिनेशभाऊ बाविस्कर योगेशभाऊ आहेर, पोपटभाऊ आहेर सागर राजपूत यांच्यासह भोलेश्वर कॉलनीतील महिला व पुरुष शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले. तसेच या वेळी उपस्थित नगर सेवक संदीप भाऊ घोगते, भाजपा युवमोर्चा तालुका अध्यक्ष पवन भाऊ ठाकूर राजू भाऊ कमिटी,श्रीं. विशाल बैरागी गोकुल भाऊ राठोड, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इम्रान भाई शेख अदि ग्रामस्थ उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments