Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथील शक्करभाई मोहल्ला परीसरातील मुस्लिम बांधवांनी शादीखाना मंजूर करण्यात यावा......

लासुर स्टेशन येथील शक्करभाई मोहल्ला परीसरातील मुस्लिम बांधवांनी शादीखाना मंजूर करण्यात यावा… आ अंबादास दानवे.. निवेदनाद्वारे मागणी केली आहे

लासुर स्टेशन येथील शक्करभाई मोहल्ला परीसरातील मुस्लिम बांधवांनी शादीखाना मंजूर करण्यात यावा… आ अंबादास दानवे.. निवेदनाद्वारे मागणी केली आहे

दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील नगीना मस्जिद परीसरात शादीखाना मंजूर करण्यात यावा यासाठी आ अंबादास दानवे यांच्या कडे निवेदनद्वारे मागणी केली आहे दरम्यान मुस्लिम समाजातील विवाह आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी शादीखाना (मल्टीपर्पज हॉल) उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी मुस्लिम समाजातील नागरिकांकडून  करण्यात आली आहे.
     समाजातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना खाजगी हॉल परवडत नसल्याने हक्काच्या शासकीय किंवा सार्वजनिक शादीखान्याची गरज असल्याचे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे मौजे अनंतपुर लासुर स्टेशन शक्कर भाई मोहलला नगीना मस्जिद लगत असलेली ४४ बाय ६० या सहान जागेवर सभामंडप (शादीखाना)साठी अल्पसंख्यांक निधीतून ५० लक्ष निधी उपलब्ध करून द्यावा या कामामुळे गोरगरीब यांच्या शुभ कार्यासाठी आवश्यक असलेल्या शादी खाना उपयोगी येईल छत्रपती संभाजी नगर क्रांती चौक येथील त्यांचे संपर्क कार्यालय मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालयात आज त्या निवेदनावर शिवसेना पदाधिकारी सह शेकडो मुस्लिम बांधव यांच्या सह्या असलेलं निवेदन देण्यात आले आ अंबादास दानवे यांनी निवेदन स्वीकारून लासूर स्टेशन शहरातील शक्कर भाई मोहला येथील  पत्र्याचा शेड शादी खाना (सभामंडप) बांधण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन  कांजुणे शिवसेना विभाग प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण ठोळे शिवसेना उपविभाग प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मोहसीन बागवान युवा सेनेचे शहराध्यक्ष प्रतीक  खंडेलवाल शककर भाई मोहल्ला येथील नगीना मज्जिदचे अध्यक्ष बाबर शेख शिवसेना उपशहरप्रमुख शाहरुख शेख शिवसेना शाखाप्रमुख नदीम शेख आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments