श्रीराम वाचनालयात ध्वजारोहण संपन्न
संस्कृत भाषा प्रचार समिती संचालित ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय,जालना येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहन ग्रंथालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समितीच्या उपाध्यक्षा जयश्री कुलकर्णी व ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगावकर यांची उपस्थिती होती. जयश्री कुलकर्णी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी ग्रंथपाल शाम शेलगांवकर, सहायक ग्रंथपाल शैलेंद्र बदनापूरकर,मनोहर कुलकर्णी,देविदास लाखोले,दिलीप मोरे,कैलासचंद्र सराफ,श्रीकांत काळे,विजय खिल्लारे,संजय लाखोले,अशोक खेडकर,संतोष सिरस,पांडूरंग काळे,रामेश्वर चौंडिये,मिलिंद सावंत,जगदीश अग्निहोत्री,दीपक वाघमारे,अश्विनी भाले,शिल्पा शेलगांवकर,मंगला जाधव,राही यशवंते,अश्विनी कांबळे,अश्विनी गायकवाड,शकुंतला शेलगांवकर,उर्मिला सोळुंके,अभिजीत शेंडगे यांच्यासह वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
