Sunday, August 9, 2026
Homeऔरंगाबादश्री संत गजानन महाराजांच्या दिंडीचे अंबड शहरात उत्साहात स्वागत

श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीचे अंबड शहरात उत्साहात स्वागत

श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीचे अंबड शहरात उत्साहात स्वागत

अंबड/प्रतिनिधी/  श्री संत गजानन महाराजांची दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री क्षेत्र शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली असून, आज दिंडीचे अंबड शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
       दिंडीचे अंबड शहरात आगमन होताच भाविक व नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने दिंडीचे स्वागत केले. यावेळी **‘गण गण गणात बोते’**च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिंडीसोबत असलेल्या वारकरी व भाविकांनी भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले.
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अंबड शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments