राजू मोताळे यांची शिवसेना अंबड तालुका सहसंघटकपदी नियुक्ती
अंबड/प्रतिनिधी/ शिवसेना अंबड तालुक्यातील कार्यकर्ते राजू रघुनाथ मोताळे यांची शिवसेना अंबड तालुका सहसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील एक वर्षासाठी ही जबाबदारी सोपविण्यात आली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार हिकमतदादा उढाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीपत्रानुसार, राजू मोताळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करत शिवसेना पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल राजू मोताळे यांचे शिवसैनिक, पदाधिकारी व विविध स्तरांतील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.