Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्री शहरातील वार्ड क्रं. 11 मध्ये नवीन पोल बसवा , नगरसेविका अर्चना...

फुलंब्री शहरातील वार्ड क्रं. 11 मध्ये नवीन पोल बसवा , नगरसेविका अर्चना दुतोंडे 

फुलंब्री शहरातील वार्ड क्रं. 11 मध्ये नवीन पोल बसवा , नगरसेविका अर्चना दुतोंडे 

फुलंब्री/प्रतिनिधी/ सध्या पावसाळा सुरु असुन फुलंब्री शहरांतील फतेह मैदान परिसरात काही ठिकाणी विद्युत पोल हे नादुरुस्त वा पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे येथील परिसर नेहमीच अंधारात असतो. रात्री – बेरात्री चोऱ्या सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बाबतीत महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
1. अंगणवाडी येथे असलेला पोल व कोणत्याही वेळी पडु शकतो त्यामुळे येथे भितीचे वातावरण आहे.
2. सय्यद बुढन यांच्या घरासमोरील पोल हा रस्त्यात असल्यामुळे येथे वाहन धडकुन मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.
3. संदिप गोरे यांच्या घरासमोरील पोल नादुरुस्त असुन पडण्याची शक्यता आहे.
सदर उपरोक्त ठिकाणी पोल हे तात्काळ नविन न बसविल्यास येथे मोठी घटना घडुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्या कडे लक्ष द्यावे
अशी मागणी फुलंब्री नगरपंचायती च्या नगरसेविका अर्चना उमेश दुतोंडे यांनी काल दिनांक 13 जुलै रोजी केली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments