शिल्लेगाव पोलिसांची अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई अंदाजे १५० ते १७५ ब्रास वाळू केली जप्त…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर :- गंगापूर तालुक्यातील झोडेगाव परीसरातील वाळू माफियांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे दि, १०/ जुलै/२०२६ रोजी शिल्लेगाव ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाने गस्त घालत असताना झोडेगाव हद्दीतील स्मशानभूमी लगतच्या गायरान क्षेत्रात अज्ञात वाळू माफियानी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा साठा साठवून ठेवलेला होता गोपनीय माहिती सूत्राच्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला असता, तेथे एकूण ९ वाळूचे मोठं मोठे ढिगारे आढळून आले. सदर ठिकाणी अंदाजे १५० ते १७५ ब्रास अवैधरित्या वाळू साठवून ठेवलेली वाळू आढळून आले वाळूच्या साठ्याचा सविस्तर पंचनामा करून तो संबंधित पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी महसूल चे अधिकारी व तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहाराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर ग्रामीण मा अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डी वाय एसपी गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हेडकॉन्स्टेबल योगेश हरणे, हरीश सोनवणे, पोलीस अंमलदार अर्जुन तायडे, सुनील राठोड, पियुष राजपूत व स्वप्निल नरोडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.