Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वैजापूर, गंगापूर येथील शिबिर कार्यालये कार्यान्वित

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वैजापूर, गंगापूर येथील शिबिर कार्यालये कार्यान्वित

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

वैजापूर, गंगापूर येथील शिबिर कार्यालये कार्यान्वित

 

छत्रपती संभाजीनगर :- वैजापूर येथील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना झाली असून त्या अंतर्गत वैजापूर व गंगापूर या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी शिबिर कार्यालये कार्यान्वित करण्यात आली असल्याचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी वैजापूर संदीप निमसे यांनी कळविले आहे. शिबीर कार्यालयाचे कामकाजाचे दिवस याप्रमाणे- गंगापूर १- महिन्यातील पहिला मंगळवार, लासूर- दुसरा मंगळवार, गंगापूर-२- तिसरा मंगळवार, शिवूर बंगला-चौथा मंगळवार, वाळूज- प्रत्येक शुक्रवार. वेळापत्रकाप्रमाणे शिबिराच्या दिवशी शासकीय सुटी असल्यास त्या दिवसाचे नियोजन कामकाजाच्या पुढच्या दिवशी करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तरी नागरिकांनी शिबिर कार्यालयात लायसन्स, वाहन हस्तांतरण, नवीन वाहन नोंदणी, वाहन तपासणी, परवाने व इतर सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments