Monday, June 29, 2026
Homeऔरंगाबादनादरपुर उपकेंद्रात डॉक्टर नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक कक्षात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण सुरुवात

नादरपुर उपकेंद्रात डॉक्टर नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक कक्षात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण सुरुवात

नादरपुर उपकेंद्रात डॉक्टर नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक कक्षात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण सुरुवात

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येधे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ नादरपुर येथील शेतकरी पोपट जाधव यांच्या हस्ते कार्यक्रम संपन नाचनवेल आरोग्य केंद्रातील उपकेंद्र नादरपूर येथील दि १\६\२०२६ पासुन सिस्टरची बदली झाली आणि सहा ते सात गाव असलेले उपकेंद्र येथे डॉक्टर नसल्यामुळे अशा सेविकांनी प्लस पोलिओची मोहिम राबवली राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमे २०२६ अंतर्गत मौजे नादरपूर येथील उपकेंद्रात डॉक्टर नसल्यामुळे अशा सेविकांनी नादरपूर येथे ज्येष्ठ नागरिका हाॅलमध्ये रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ. पोपट जाधव दादाराव निकम यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. “दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर मात निश्चितच” हा संदेश देत गावातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले.
             पोलिओचे दोन थेंब आरोग्याचे अमूत थेंब राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २६ जून २०२६ ते ३० जून २०२६ आपले मूल आहे देशाचे भविष्य लसीकरण करा, निरोगी भविष्य घडा राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. गावातील सर्व पात्र बालकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिद होते. नागरिकांनीही मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरणांचे महत्व अधोंस्तिलते केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments