Saturday, June 27, 2026
Homeऔरंगाबादअश्लील व्हिडिओची धमकी देत पैशांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अश्लील व्हिडिओची धमकी देत पैशांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अश्लील व्हिडिओची धमकी देत पैशांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुख्य सूत्रधार महिलेसह ६ आरोपी जेरबंद; ₹२.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना/प्रतिनिधी/  चंदनझिरा पोलिसांनी अपहरण,मारहाण,अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामीची धमकी देत पैशांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधार महिलेसह सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹ २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नवीन मोंढा रोड परिसरातून एका बोलेरो चालकाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने वाहनात कोंबून ट्रान्सपोर्ट परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला. आरोपींनी पीडिताचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच नातेवाईक व मित्रांकडून फोनद्वारे पैसे मागवून ते आरोपींच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. या प्रकरणी २३ जून २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला.तपासादरम्यान मुख्य सूत्रधार सपना संतोष निकाळजे हिला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या चार तासांत आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली. तपासात आरोपींनी यूपीआयद्वारे रक्कम हस्तांतरित करून ती काढून घेतल्याचेही निष्पन्न झाले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments