Thursday, June 25, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथील बसस्थानक परिसरात टवाळखोरांना दिला पोलीसांनी  चोप...

लासुर स्टेशन येथील बसस्थानक परिसरात टवाळखोरांना दिला पोलीसांनी  चोप…

लासुर स्टेशन येथील बसस्थानक परिसरात टवाळखोरांना दिला पोलीसांनी  चोप…

लासुर स्टेशन परिसरात दामिनी पथक पेट्रोलिंग करण्याची मागणी नागरिकासह पालकांनी केली आहे 
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे बसस्थानक परिसरात शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर काही टवाळखोर युवकांकडून दुचाकींवर धोकादायक स्टंटबाजी केली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विद्यार्थिनींच्या उपस्थितीत लक्ष वेधून घेण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवणे, दुचाकी उडवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली जात आहे. दरम्यान
  परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, बसस्थानक परिसरात हा प्रकार नवा नसून अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्टीच्या वेळेत काही युवक मुद्दाम गर्दीच्या ठिकाणी स्टंटबाजी करत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी दोन तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच  छत्रपती शाहू महाराज  महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा व कन्या शाळा मार्गावर नियमित पोलिस गस्त वाढवून टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात आली होती आज शिल्लेगाव पोलीसांनी बस स्थानक जाऊन काही टवाळखोरांना चांगलं चोप दिला आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती यावेळी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे योगेश हारणे रवींद्र कीर्तिकर पोलीस कर्मचारी सह होमगार्ड यांची उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments