Friday, April 3, 2026
Homeऔरंगाबादजालना बसस्थानक परिसरात वाहतूक शिस्तीसाठी कठोर कारवाई! 

जालना बसस्थानक परिसरात वाहतूक शिस्तीसाठी कठोर कारवाई! 

जालना बसस्थानक परिसरात वाहतूक शिस्तीसाठी कठोर कारवाई!

जालना बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी टाळून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण मोहिमेअंतर्गत ऑटो रिक्षांवर कारवाई करण्यात आली. बसस्थानकाबाहेर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या अनेक रिक्षांची तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतूक सुरळीत राखण्यासाठी ऑटो रिक्षा चालकांना मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. बसस्थानक परिसरात रिक्षांच्या अनधिकृत पार्किंगमुळे प्रवासी वाहतूक बाधित होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते.

यासोबतच जालना बसस्थानक डेपो व्यवस्थापकांची भेट घेऊन बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’ चे स्पष्ट फलक तात्काळ बसविण्याबाबत निर्देश देण्यात आले. बसस्थानकाच्या हद्दीत किंवा मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा उभ्या राहू नयेत याबाबतही त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

ही संपूर्ण मोहीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जालना श्री. चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, पुढील काही दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतूक शिस्तीसाठी आणि जालना शहरातील सततच्या वाहतूक व्यवस्थापन सुधारासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments