Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादशेतकऱ्याची शेतातील विहिरीतील मोटार चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून...

शेतकऱ्याची शेतातील विहिरीतील मोटार चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारी जप्त करून MIDC पैठण पोलीस स्टेशन यांनी केली धडाकेबाज कारवाई

शेतकऱ्याची शेतातील विहिरीतील मोटार चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारी जप्त करून MIDC पैठण पोलीस स्टेशन यांनी केली धडाकेबाज कारवाई

पैठण/प्रतिनिधि/  पोलीस स्टेशन हद्दीतील ईसारवाडी येथील शेतकरी  जनानाथ गंगाजी बोबडे यांची शेतातील ०३ एचपी ची पारसमणी कंपनीची पाण्याखालील इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्याने विहीरीतुन काढून चोरुन नेले बाबत पोलीस ठाणे एम.आय. डी. सी.पैठण येथे तक्रार दिली होती. सदर गुन्हाचा कौशल्यपूर्ण तपास केला असता गोपनिय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की सदर शेतकरीची इलेक्ट्रिक मोटार चोरी ही आरोपी नामे आत्माराम सखाराम जगदाळे,प्रभाकर बाबुराव बडै दोन्ही रा.धनगाव ता.पैठण व गंगाराम रामनाथ माळी रा.बोरगाव ,तुळशीराम दिलीप गायकवाड़ रा.ईसरवाडी यांनी केल्याची माहीती मिळाली.त्याअनुषंगाने आरोपी ताब्यात घेवन पोलीसानी विचारपुस असता मोटारी चोरी केल्याची कबुली दिली आहे.त्यावरुन आरोपीताच्या ताब्यातुन ८० हजार रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आल्या
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री प्रकाश जाधव,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि/ भरत मोरे,पोह २३० राहुल मोहतमल,पोकॉ/ १२२ घोडके यांनी केली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments