Monday, September 28, 2026
Homeऔरंगाबादपैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे रेशनचा काळाबाजार; ५ ऑक्टोबरपासून रेशनकार्ड धारकांचे तहसील कार्यालयासमोर...

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे रेशनचा काळाबाजार; ५ ऑक्टोबरपासून रेशनकार्ड धारकांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण!

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे रेशनचा काळाबाजार; ५ ऑक्टोबरपासून रेशनकार्ड धारकांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण!

एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष छोटू मोरे यांचा इशारा; ११ सप्टेंबर रोजी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कारवाई नाही.
 पैठण/प्रतिनिधी/ तालुक्यातील पिंपळवाडी पि. येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक २०७ चे दुकानदार आडसरे यांच्याकडून शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्याचे वाटप केले जात नसून, केवळ बायोमेट्रिक अंगठे घेऊन धान्याचा मोठा गैरव्यवहार व काळाबाजार केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने, येत्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पैठण तहसील कार्यालयासमोर पीडित रेशनकार्ड धारक आपल्या सहकुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष छोटू मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपळवाडी येथील शासकीय रास्त भाव धान्य दुकान क्र. २०७ चे चालक आडसरे हे रेशनकार्ड धारकांची सर्रास फसवणूक करत आहेत. नियमानुसार मिळणारे धान्य नागरिकांना न देता, मशीनवर केवळ लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक अंगठे उमटवून घेतले जातात आणि धान्याची परस्पर विल्हेवाट लावून काळाबाजार केला जातो, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.या गंभीर प्रकाराबाबत एकलव्य संघटनेचे पैठण तालुकाध्यक्ष छोटू मोरे यांच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन रेशन दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रार देऊन अनेक दिवस उलटूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे रेशनकार्ड धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर एकलव्य संघटनेने आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. जर येत्या काही दिवसांत संबंधित दोषी दुकानदारावर कारवाई झाली नाही, तर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व पीडित रेशनकार्ड धारक आपल्या कुटुंबासह पैठण तहसील कार्यालयाच्या आवारात ‘आमरण उपोषणाला’ बसणार आहेत, अशी माहिती छोटू मोरे यांनी तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात दिली आहे. या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे पैठण तालुक्यात रेशन विभागाच्या कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments