चौका जमीन व्यवहाराची एसआयटी चौकशी करा; देवगिरीच्या सभेत एकमुखी ठराव !
फुलंब्री/प्रतिनिधी/ औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्रीचा देवगिरी साखर कारखान्याची चौका येथील जमिनीच्या खरेदी विक्रीची एसआयटीमार्फत चौकशी करा, असा एकमुखी ठराव आजच्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
फुलंब्री येथील सहकारी साखर कारखान्याची २८ वी सर्वसाधारण सभा प्रशासकीय चेअरमन कल्याणराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, प्रशासकीय संचालक नितीन देशमुख, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, माजी चेअरमन जगन्नाथ काळे, कार्यकारी संचालक विजय गावंडे आर्दीची उपस्थिती होती.
यावेळी चौका येथील जमीन विक्रीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, या गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जगन्नाथ काळे यांनी केली. यावेळी सभासदांनी एकमुखी
संमती दिली, तसेच राज्य सहकारी बँकेने कर्जापोटी कारखाना ताब्यात घेतला होता. त्याकाळात मोठ्या प्रमाणात चोच्या झाल्या आहेत. त्यांची जबाबदारी राज्य सहकारी बँकेवर निश्चित करून त्यांच्याकडून भरपाई करून घ्यावी, अशी मागणी बावेळी करण्यात आली.
सदर चौकशीसाठी आम्ही आमच्या पातळीवर कारखान्याला सहकार्य करण्यास तयार असल्याची हमी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुहास शिरसाट व आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.
चेअरमन कल्याण चव्हाण यांनी वार्षिक ताळेबंद सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मोरे, तर आभार संचालक नितीन देशमुख यांनी मानले. यावेळी पंचायत समिती सदस्य गणेश काळे, सभापती सर्जेराव मेटे, बाळू तांदळे, सरपंच संतोष तांदळे, लहु पाटील मानकापे, अंबादास गायके, सांडू पाटील जाधव, जिल्हा परिषद सदस्य निखिल चव्हाण, दूध संघाचे संचालक संदीप बोरसे, संतोष मेटे, सुदाम मते, ज्ञानेश्वर मते, एकनाथ धटींग, सदाशिव विटेकर आदी शेकडो सभासदांची उपस्थिती होती.