Homeऔरंगाबादजनहिताच्या निवेदनाची दखल; जालना शहरातील पथदिवे सुरू

जनहिताच्या निवेदनाची दखल; जालना शहरातील पथदिवे सुरू

जनहिताच्या निवेदनाची दखल; जालना शहरातील पथदिवे सुरू

आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानंतर संबंधित विभागाची कार्यवाही; सामाजिक कार्यकर्ते राहुल करनाडे यांच्या पाठपुराव्याला यश
जालना/प्रतिनिधी/  जालना शहरातील मुंडे चौक ते रामचंद्र आर्य चौक, विवेकानंद हॉस्पिटल परिसर तसेच धाडेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील बंद असलेले पथदिवे अखेर सुरू करण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या दखलीनंतर संबंधित विभागाने कार्यवाही केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
        या परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून ये-जा करावी लागत होती. या मार्गावर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच धाडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
        या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल सत्यनारायण करनाडे यांनी जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे निवेदन सादर केले होते. तसेच निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातही देऊन संबंधित मार्गावरील पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
          या निवेदनाची दखल घेत आयुक्त अंजली शर्मा यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित विभागाने कार्यवाही करून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी परिसरातील पथदिवे सुरू केले. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
         सार्वजनिक ठिकाणी पथदिवे सुरू असणे हे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जनतेच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल करनाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments