आलेस गणपतराव निकाळजे यांचे निधन
जालना/प्रतिनिधी/ डग्लस गर्ल्स हायस्कूल, जालना येथील माजी मुख्याध्यापिका आलेस गणपतराव निकाळजे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक क्षेत्रासह परिचित व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. आलेस निकाळजे यांनी डग्लस गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून प्रदीर्घकाळ कार्य केले. शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, माजी विद्यार्थि, विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग आणि परिचितांनी दुःख व्यक्त केले.
