भाजपच्या जालना ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
जालना/प्रतिनिधी/ भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची व मंडळ अध्यक्षाची महत्त्वपूर्ण बैठक भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 ऑक्टोंबर 2026 रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,जालना येथे रोजी संपन्न झाली.
या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, मन की बात, मंडळ स्तरावरील कामकाजाचा आढावा घेणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे आणि विविध उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. मंडळ स्तरावर संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे आणि पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. तसेच आगामी काळात संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली.
संघटन मजबूत, कार्यकर्ता सक्षम आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ या ध्येयाने सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. जालना ग्रामीण जिल्ह्यात पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी समन्वयाने काम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीला भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, गोविंद ढेंबरे,रमेश भापकर, जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र धोका,शंकर लहामंगे,पद्माकर जऱ्हाड, जिजाबाई जाधव, जिल्हा चिटणीस राजु साळवे,शोभाबाई देशमुख,गगांसागर पिंगळे, हरीचंद्र शिंदे,मन की बात जिल्हा सह संयोजक देविदास देशमुख,राजेश जोशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टाकले, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवान बारगाजे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश टकले, जिल्हा कोषाध्यक्ष कल्याण काळे,जिल्हा प्रसिदीप्रमुख बाबासाहेब कोलते, मंडळाध्यक्ष भगवान मात्रे,ज्ञानेश्वर भागीले,गणेश इंगळे,शत्रुघ्न कणसे,नितीन राठोड,विक्रंम उफाड,सौरभ कुलकर्णी,संजय आटोळे,शिवाजी मोरे,विष्णु जाधव,गजानन नागवे,दत्ताभाऊ टापरे,अमोल कुलकर्णी,नरेश बुंदीलखंडे,दगडूबा गोरे,ज्ञानेश्वर तनपुरे, विकास पालवे उध्दव काळे, दिपक मुंडलीक, बाबासाहेब कऱ्हाळे, आनंद जाधव यांच्यासह सर्व मंडळाध्यक्ष आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
