Homeऔरंगाबादयेरगी येथे पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक दुर्गामातेची भव्य मिरवणूक

येरगी येथे पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक दुर्गामातेची भव्य मिरवणूक

येरगी येथे पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक दुर्गामातेची भव्य मिरवणूक

देगलूर/प्रतिनिधी/   भारतीय संस्कृती आणि पारंपरिक भक्तीपरंपरेचे जतन करत, सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीने येरगी येथे भक्तिमय व पारंपरिक पद्धतीने दुर्गामातेची मिरवणूक पार पडली.
     या मिरवणुकीमध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अभंगवाणीच्या सुरांतून भजन सादर करणाऱ्या भजनी मंडळांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध भजनी मंडळे आणि ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने सहभागी होत आई जगदंबेच्या भक्तीत तल्लीन होऊन या सोहळ्याची शोभा वाढवली.
        आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचे, वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे आणि भक्तीभावाचे दर्शन घडविणाऱ्या सर्व भजनी मंडळांचे, प्रतिष्ठित नागरिकांचे, ग्रामस्थांचे आणि भाविक भक्तांचे सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
        नवरात्र महोत्सव व मिरवणुकीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री सार्वजनिक दुर्गा माता नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष यादव बरसमवार, उपाध्यक्ष दिगांबर परिट, सचिव प्रभाकर बरसमवार, सहसचिव मोगलाजी बरसमवार, कोषाध्यक्ष नागनाथ बरसमवार, सहकोषाध्यक्ष अशोक गटावार, कॅशियर विकास येरपलवार, मार्गदर्शक आदर्श सरपंच संतोष पाटील येरगीकर, मारोती बरसमवार, अशोक बरसमवार, मलन्ना बरसमवार, शंकर गटावार, हणमंत यरपलवार, गगाधर बरसमवार, अशोक येरपलवार, पुजारी राजु सोमावार, नरसिंग वाघमारे, मारोती गटावार, माधुगोंडा भुरूळे, भजनी मडळ मलिकार्जुन भोकसखेडे, विश्वनाथ बागेवार, विठ्ठल पांचाळ, लक्ष्मण भुरूळे, हणमंत चिलकालर, अशोक बरसमवार, लक्ष्मण दाकपाडे, माधव बरसमवार, सायलू कांबळे, नागन्ना परीट मारोती भुरळे आदींनी विशेष परिश्रम केले .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments