Homeऔरंगाबादघुंगर्डे हादगाव येथे आजपासून बेमुदत उपोषण सुरू!

घुंगर्डे हादगाव येथे आजपासून बेमुदत उपोषण सुरू!

घुंगर्डे हादगाव येथे आजपासून बेमुदत उपोषण सुरू!

शाळेच्या दानपात्र जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष
अंबड/प्रतिनिधी/ घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दानपात्र जमिनीवरील अतिक्रमण हटवून शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना अंतिम नोटीस देण्यात आली असून, मागण्यांवर तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळेला दानस्वरूपात प्राप्त झालेल्या गट क्रमांक २ मधील जमिनीचे संरक्षण करणे आणि या जागेवरील कथित अनधिकृत अतिक्रमण हटविणे यासाठी ग्रामस्थ व पालकांनी यापूर्वीही ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. तसेच स्मरणपत्र देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
१. शाळेच्या दानपात्र जमिनीची तात्काळ साफसफाई करून जागा ताब्यात घ्यावी.
२. जमिनीवरील सर्व बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमण तातडीने हटवावे.
३. संबंधित जागेला कायमस्वरूपी पक्के तारकुंपण किंवा संरक्षण भिंत उभारावी.
४. सार्वजनिक व शैक्षणिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
      या मागण्यांसाठी यापूर्वी निवेदने व स्मरणपत्रे देण्यात आली होती. मात्र, मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही झाली नसल्याने बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे अंतिम नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. शाळेची जमीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अतिक्रमणाबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी आणि शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि मागण्यांवर कधी ठोस निर्णय होतो, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments