Monday, October 5, 2026
Homeऔरंगाबादधावपटूंनी गाजवले बी झोन; देगलूर महाविद्यालयाला अनेक पदकांची कमाई

धावपटूंनी गाजवले बी झोन; देगलूर महाविद्यालयाला अनेक पदकांची कमाई

धावपटूंनी गाजवले बी झोन; देगलूर महाविद्यालयाला अनेक पदकांची कमाई

देगलूर/प्रतिनिधी/  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बी झोन विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली. यामुळे महाविद्यालयाची मैदानी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
        महिलांच्या गटात कु. रविना गवळी हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, तर ४०० मीटर धावण्यात रौप्यपदक पटकावले. कु. रीना गवळी हिने २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली.पुरुषांच्या गटात गवळी रोहन याने १०० मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही प्रकारांत कांस्यपदक मिळविले. अमित कुरुळेकर याने १५०० मीटर धावण्यात, तर हलबुरगे मलगोंडा याने ४०० मीटर धावण्यात कांस्यपदक पटकावले.
            सांघिक प्रकारातही देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक, तर ४×४०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक प्राप्त केले. ४×१०० मीटर रिले संघात रीना गवळी, रविना गवळी, गुंडूरे वैष्णवी व डुबुकवाड अंबिका यांचा समावेश होता.तसेच मुलांच्या ४×४०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले. या संघात गवळी रोहन, कोरेवार यादव, अमित कुरुळेकर, तलवारे विकास, सुळे प्रसाद व हलबुरगे मलगोंडा यांनी सहभाग घेतला.
        या यशस्वी कामगिरीसाठी महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. निरजकुमार उपलंचवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. वावधाने दीपक व प्रा. हाके सिताराम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळातील सदस्य देवेंद्र मोतेवार, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार व सुभाषराव सांगवीकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments