Monday, October 5, 2026
Homeऔरंगाबादपालकांनी पाल्यांना पुरेसं लक्ष व वेळ द्यावा?

पालकांनी पाल्यांना पुरेसं लक्ष व वेळ द्यावा?

पालकांनी पाल्यांना पुरेसं लक्ष व वेळ द्यावा?

          पालक…… आजचे काही पालक आपल्या पाल्यांच्या विकासासाठी फार महत्वाची भुमिका पार पाडत आहेत. ते आपल्या पाल्यांना शिकवितातच. त्यांना वेळातील वेळ देतातच. ज्यातून विद्यार्थ्यांचा विकासही होत असतो. परंतु काही पालक आजही सुशिक्षीत असले तरी आपल्या पाल्यांकडे विशेष असं लक्ष देत नाहीत. त्यांना पुरेसा वेळ देत नाहीत. कारण मोबाईलचा काळ आहे व ते पालक आपल्या फावल्या वेळेत आपल्या पाल्यांकडे वेळ देण्याऐवजी मोबाईलमध्ये गुंतून राहतात. ज्यातून त्यांच्या मुलांचा विकास खुंटतो. मात्र पुर्वी असं नव्हतंच. पुरुषसत्ताक कुटुंबपद्धती असल्यानं फक्त आईच आपल्या मुलांकडे लक्ष देत असे. चूल व मूल हे स्रीचं कार्य समजलं जायचं. ज्यातून स्रीच आपल्या मुलांना घडविण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार फुलविण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायची. वेळही द्यायची. कारण पुरुष कुठं ना कुठं गुंतलेलाच असायचा. आज समाज सुधारलेला असून समाजात समानता आलेली आहे. त्यामुळंच जसा आज पुरुष काम करतो. तशीच स्रीही काम करायला लागलेला आहे. त्यामुळंच मुलांकडे ते विशेष लक्ष दोघांनीही देण्याची गरज आहे. त्यासोबतच पुरेसा वेळही.
          आजच्या काळात बरीचशी मुलं ही आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर आहेत. जसे की ते मेधावी यादीत पहिल्या क्रमांकावर येत आहेत. त्याचंही कारण म्हणजे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणं. ते पालक आपल्या मुलांची खाजगी शिकवणी लावून देतात. मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना खाजगी शिकवणी वर्गाला पाठवतात. ती मुलं खाजगी शिकवणीतून घरी आल्यावर शाळेत काय शिकवलं व काय शिकवलं नाही. ते तपासतात. त्यातच खाजगी शिकवणी वर्गात काय शिकवले, काय नाही तेही तपासतात. ज्यातून अशांची मुलं पुढं जातातच.
           शिक्षक……. शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यासाठी पुरेसा वेळ देतात. ते एकएका विद्यार्थ्याला वेळ देतात. ज्यातून त्यांच्या वर्गातील मुलं पुढे जातात. त्यांची प्रगती होते. परंतु हे जरी खरं असलं तरी काही मुलं ही निश्चितच मागं राहतात. त्याचं कारण आहे पुरेसा विद्यार्थ्यांना वेळ देणं. ज्या मुलांना, पालक, शिक्षक आणि इतर सर्व घटक पुरेसा वेळ देत असतात. उदाहरण द्यायचं असेल तर थॉमस अल्वा एडीसनचं देता येईल. त्यांचे वेगवेगळे प्रश्न ऐकून हताश झालेल्या शिक्षकांनी त्याला वर्गातून खरंलतर हाकलून लावले. त्याच्याजवळ शाळा सोडल्याचा दाखला दिला व एक चिठ्ठी लिहिली की ज्या चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘आपला मुलगा शाळा शिकविण्याच्या व शाळेत बसू देण्याच्या लायक नाही. आजपासून आम्ही त्याला शाळेत बसू देणार नाही.’
         ती चिठ्ठी…… ती चिठ्ठी पाहताच त्याची आई हताश झाली नाही. तशी ती शिकली नव्हतीच. ती काय शिकविणार होती आपल्या मुलाला. परंतु तिनं आपल्या मुलाचा अपेक्षाभंग होवू दिला नाही. ती दररोज कामाला जायची व सायंकाळी घरी आल्यावर आपल्या मुलाला घेवून बसायची. त्यातच तो जे जे प्रश्न करायचा. त्याची उत्तरं शोधून ती त्याला द्यायची. ज्या बहुमुल्य वेळ देण्यातून तिचा मुलगा घडला व तो जागतिक स्तराचा शास्रज्ञ बनला. परंतु ही प्रक्रिया आजच्या काळात कोणाचीच आई करीत नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास तीच मुलं पुढे जात असतात व उच्चतम अर्हताही प्राप्त करीत असतात. ज्यांना पालक, शिक्षक पुरेसा वेळ देत असतात. ज्या मुलांना पालक पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. ती मुलं मागंच राहतात. अभ्यास आणि सर्व गोष्टीत.
         आपल्या मुलांना वेळ देणं. ही एक प्रक्रिया आहे. शिक्षक, पालकांचे आपल्या मुलांना वेळ देणे. ही देखील एक प्रक्रियाच आहे. परंतु आज पुरेसा वेळ देण्याची प्रक्रिया ही घडत नाही. त्याचं कारण आहे, पालकांची मुलं. आज महागाई आहे व महागाईत सर्वच वस्तू महागलेल्या आहेत. घराच्या गरजा पुर्ण होत नाहीत. अशा गरजा पुर्ण करण्यासाठी दररोज पालकांना कामाला जावं लागतं. एकाएका घरी कितीतरी मुलं असणं. अशा मुलांचं जेवनखावण, पालनपोषण करण्यासाठी पालकांना सतत कामाला जावं लागतं. कारण पोटाची खळगी महत्त्वपूर्ण. पालक मंडळी ही पोटाची खळगी भरण्यासाठी सतत कामाला जात असतात. ज्यातून ते आपल्या मुलांना वेळ अःएत नाहीत. ज्यातून नुकसान होतं.
        शिक्षकही अशी मुलं शाळेत आली आणि ती कमकुवत असली तर त्यांच्याकडे विशेषतः दुर्लक्ष करतात. त्याचं कारण आहे, विद्यार्थ्यांचं विस्मरण. विद्यार्थ्यांना जे शिकवलं जातं. ते शिकविलेलं पालकांच्या पुरेसा वेळ न देण्यानं बरेच विद्यार्थी विसरुन जातात. ज्यातून जो भाग शिकवला. तोच भाग त्याच विद्यार्थ्यांना लक्षात राहात नाही. ज्यातून शिक्षकांनाच त्रास होतो. कारण वर्गात तोच एकच विद्यार्थी नसतो. इतरही विद्यार्थी असतात की ज्यांचे पालक हे विशेषतः आपल्या मुलांकडे जातीनं लक्ष देतात. ते पालक जास्त जागृत असल्यानं शिक्षकांनाही जास्त विचारणा करीत असतात. त्यामुळंच तीही मुलं मागं पडू नये. ही भीती शिक्षकांना वाटते. कारण त्याचा जाब विचारण्यासाठी त्याचे पालक आवर्जून तयार असतात. मग शिक्षकही ज्या विद्यार्थ्यांचं वर्गात सतत विस्मरण होतं. त्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात व जे विद्यार्थी काहीतरी करु शकतात. त्यांच्याकडेच लक्ष देत असतात. ज्यातून जे पालक आपल्या मुलांकडे वेळ देत नाहीत. अशांची मुलं मागं पडतात. महत्त्वपूर्ण बाब ही की पालकांनीही आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे. आपली मुलं मागं पडू नये यासाठी. काही पालक असे असतात की मला माझ्या मुलाच्या शिक्षणातील काही समजत नाही. मी काय करणार. असेही म्हणतात. परंतु त्यांनी थॉमस अल्वा एडीसनची गोष्ट लक्षात घ्यावी. ज्या थॉमसच्या अशिक्षीत आईनं, त्याला शाळेतून हाकलून लावल्यानंतर आपल्याला काहीच येत नाही. हा विचार करुन जर थॉमसकडे लक्ष दिलं नसतं, तर थॉमस एडीसन शास्रज्ञही बनला नसता. दुसरं उदाहरण आहे, शिवाजी महाराजांचं. शिवाजीचे वडील शहाजीराजे हे शिवराय जेव्हा लहान होते, तेव्हा सतत युद्धात गुंतून राहात असत. त्यावेळेस जिजामातेनीच शिवरायांना शिकवलं. हेच उदाहरण नाही तर पुर्वीच्या काळात सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं बाहेर असणारी पुरुष जात. आईच घरी मुलांना योग्य ते शिक्षण देत असे. त्यांना शिकवीत असे. ज्यातून मुलामुलींचा त्या काळात विकास करता आला. हे एका महिलेनंच केलेलं काम आहे. तेव्हा चूल आणि मूल हीच पद्धती असल्यानं महिलांनी आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी दिलेला वेळ बरोबर होता. आता मात्र समाज सुधारला. आता समानता आल्यानं स्री व पुरुष हे दोघेही घटक कामाला जात असतात. माहितच आहे की त्यांच्याकडे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. परंतु असं जरी असलं तरी सर्वच आईवडीलांनी वेळात वेळ काढून आपल्या पाल्यांकडू पुरेसा तरी वेळ द्यावा. ज्यातून मुलांचा विकास होवू शकेल. यात शंका नाही. तरंच मुलं घडतील व त्यातून कोणी थॉमस एडीसन तर कोणी शिवाजी देखील तयार होवू शकेल. हे तेवढंच खरं.
-अंकुश शिंगाडे 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments