Tuesday, September 29, 2026
Homeऔरंगाबादगंगापूर महास्थान रक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 'मुंबई चक्रव्यूह महाआंदोलनाचा' इशारा: महानुभाव...

गंगापूर महास्थान रक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ‘मुंबई चक्रव्यूह महाआंदोलनाचा’ इशारा: महानुभाव पंथीय व मराठा समाजाची संयुक्त आंदोलनाची हाक

गंगापूर महास्थान रक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ‘मुंबई चक्रव्यूह महाआंदोलनाचा’ इशारा: महानुभाव पंथीय व मराठा समाजाची संयुक्त आंदोलनाची हाक

​खुलताबाद/प्रतिनिधी/ गंगापूर येथील महानुभाव पंथाच्या पवित्र महास्थानावरील अतिक्रमण हटवून संरक्षण करावे आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर करावे, या मुख्य मागण्यांसाठी राज्यातील महानुभाव पंथीय समाज व मराठा समाज आक्रमक झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागण्यात आली असून, योग्य व तातडीचा निर्णय न झाल्यास २०२६ च्या अवतार दिना दिवशी मुंबईत भव्य ‘चक्रव्यूह महाआंदोलन’ छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर येथील पवित्र महास्थानाच्या संरक्षणाची मागणी :- गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) हे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या पावन चरणांनी पुनीत झालेले ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले महास्थान आहे. सध्या या पवित्र स्थानाची विटंबना होत असून तेथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमाणाची समस्या निर्माण झाली आहे. हे सर्व अतिक्रमण तातडीने हटवून महास्थान अतिक्रमणमुक्त करावे व त्यास पुराभिलेख / पुरातत्व विभागामार्फत पूर्ण संरक्षण देण्यात यावे, अशी तीव्र भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.
‘लीलाचरित्र’ ग्रंथाला एकमेव शासनमान्य अधिकृत दर्जा देण्याची मागणी :- महानुभाव पंथाचा मूळ व आद्य ग्रंथ ‘लीलाचरित्र’ हा पंथीय जीवन, धर्म व आचारांचा मुख्य आधार आहे. सध्या बाजारात या ग्रंथाच्या परस्परविरोधी माहिती असलेल्या विविध आवृत्या उपलब्ध असल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यासाठी शासनाने तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार केवळ एकाच अधिकृत लीलाचरित्र ग्रंथाला शासनमान्यता द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा आग्रह :- धार्मिक स्थानांच्या संरक्षणासोबतच राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर करावे, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. ‘मराठा समाज व महानुभाव पंथ’ या दोन्ही घटकांनी एकत्र येत ही एकजूट अधिक मजबूत केली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.सन २०२६ च्या ‘अवतार दिनी’ मुंबईत धडक आंदोलनाचा इशारा :- शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक पावले न उचलल्यास २०२६ च्या अवतार दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे विशाल महाआंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. आझाद मैदान, मंत्रालय आणि महाराष्ट्र सदन या प्रमुख ठिकाणी हे ‘चक्रव्यूह महाआंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी स्तरावर निवेदने सादर करण्याचे सत्र :- मुंबईतील आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांचे निवेदन सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महात्मा श्रीगोविंदराज महानुभाव व इतर परमार्ग सेवकांच्या नेतृत्वाखाली हे जनजागृतीचे काम सुरू करण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यव्यापी मोहिमेचे नियोजन :- या लढ्याला राज्यभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी आणि तरुण व भाविकांना एकत्र आणण्यासाठी व्यापक सोशल मीडिया मोहीम सुरू करण्यात आली आहे.या  माध्यमातून डिजिटल चळवळ उभारली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments