Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादजालना जिल्ह्यात काँग्रेसचा संयुक्त दुष्काळ पाहणी दौरा: हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत...

जालना जिल्ह्यात काँग्रेसचा संयुक्त दुष्काळ पाहणी दौरा: हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

जालना जिल्ह्यात काँग्रेसचा संयुक्त दुष्काळ पाहणी दौरा: हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
भोकरदन/प्रतिनिधी/
जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संयुक्त दुष्काळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे व माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
वरफळ येथे प्रत्यक्ष शेतीची पाहणी
     दौऱ्यादरम्यान परतूर तालुक्यातील वरफळ येथील शेतकरी श्रीमती अयोध्या जाधव यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने पिके करपून गेल्याचे चित्र समोर आले आहे.
      सोयाबीन पिकाची दुर्दशा: सोयाबीनचे पीक पूर्णतः वाळले असून अनेक झाडांना शेंगा लागलेल्या नाहीत; ज्या ठिकाणी शेंगा लागल्या आहेत, त्यात दाणे भरलेले नाहीत.
इतर पिकांची हानी: कापूस व तूर या प्रमुख खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अर्ध्याहून अधिक पीक वाया गेले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments