Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादशेतातील घरांना रात्रीची सिंगल फेज वीज द्या

शेतातील घरांना रात्रीची सिंगल फेज वीज द्या

शेतातील घरांना रात्रीची सिंगल फेज वीज द्या
सिंगल फेज बंद; शेतातील घरांना वीज कधी मिळणार?
शेतकरी कुटुंबांची सुरक्षितता धोक्यात; ऊर्जा मंत्र्यांकडे निवेदन
घनसावंगी/प्रतिनिधी/  घनसावंगी तालुक्यातील शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबांना रात्रीची सिंगल फेज वीज पूर्ववत सुरू करून द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबांसह शेतातच वास्तव्यास असून, महावितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे मोबाईल चार्जिंग,पाणीपुरवठा यासह घरातील दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात रात्रीच्या वेळी साप, वन्यप्राणी व इतर प्राण्यांचा वावर असल्याने अंधारामुळे धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे शेतातील घरांसाठी रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी रात्रीची सिंगल फेज वीज सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीरंग कामठे,सुभाष जऱ्हाड, उद्धव माने,अशोक कामठे, बाबासाहेब सस्ते,गणेश मराठे, गणेश मेंगडे, विष्णू मोरे, दादाभाऊ आमले, शरद पवार, भीमराव दाहातोंडे, सुरेश मोरे, विशाल मोरे, विष्णू कामठे, जगदीश वैष्णव, जनार्दन लोहकरे, लक्ष्मण सुरडकर आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments