Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी मंदाताई वाकळे; दोन महिन्यांसाठी सूत्रे हाती

खुलताबाद पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी मंदाताई वाकळे; दोन महिन्यांसाठी सूत्रे हाती

खुलताबाद पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी मंदाताई वाकळे; दोन महिन्यांसाठी सूत्रे हाती

​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती सुनिता खंडागळे या दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीवर गेल्याने पंचायत समितीचा संपूर्ण कारभार उपसभापती मंदाताई बद्रीनाथ वाकळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्या १७ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर या कालावधीत प्रभारी सभापती म्हणून पंचायत समितीचा गाडा हाकणार आहेत.
​       विकासकामांना गती देण्याचा संकल्प सभापतीपदाचा भार स्वीकारल्यानंतर मंदाताई वाकळे यांचे राजकीय व सामाजिक वर्तुळातून जोरदार स्वागत होत आहे. तालुक्यातील रस्ते, पाणी, शिक्षण व ग्रामीण विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना तात्काळ मार्गी लावून प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीमुळे पंचायत समितीच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.​नेत्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
मंदाताई वाकळे यांनी पदभार स्वीकारताच तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आमदार अंबादास दानवे तसेच तालुका प्रमुख राजू वरकड यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याशिवाय तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments