फुलंब्रीत उद्धव ठाकरे सेनाला धक्का, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा शिवसेना एकनाथ शिंदे सेनात प्रवेश काल दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे प्रवेश सोहळा पार पडला.
फुलंब्री नगरपंचायती चे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या नेतृत्व खाली कॉंग्रेस पक्षाचे उपनगराध्यक्ष जमीर पठाण, नगरसेवक व नगरसेविकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सात नगरसेवक , अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे चार नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एक नगरसेवक स्वीकृत एक नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचा स्वागत केले. तसेच आमदार अब्दुल सत्तार , पालकमंत्री संजय शिरसाठ , औरंगाबाद चे खासदार संदिपान भुमरे , राधाकिसन पठाडे, जिल्हाप्रमुख रमेश पवार, आमदार विलास भुमरे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.