Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्री खुलताबाद रोड व औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ एच रस्त्याच्या...

फुलंब्री खुलताबाद रोड व औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ एच रस्त्याच्या हद्दीत झालेल्या अनाधिकृत अतिक्रमण ७ दिवसात हटवा, औरंगाबाद जिल्हाधिकारींचे आदेश

फुलंब्री खुलताबाद रोड व औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ एच रस्त्याच्या हद्दीत झालेल्या अनाधिकृत अतिक्रमण ७ दिवसात हटवा, औरंगाबाद जिल्हाधिकारींचे आदेश

फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री खुलताबाद रोड व औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ एच रस्त्याच्या हद्दीत झालेल्या अनाधिकृत अतिक्रमण ७ दिवसात हटवा, औरंगाबाद जिल्हाधिकारींचे आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयात सुमोटो याचिकानुसार आदेशानुसार काल दिनांक १९ ऑगष्ट २०२६ रोजी देण्यात आले आहे. यासंदर्भात अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आले आहे.
       राष्ट्रीय महामार्ग या विभागांतर्गत क्र. ७५२ एच अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या पालफाटा-फुलंब्री-खुलताबाद या लांबीतील कामे सुरु आहेत. तसेच या राष्ट्रीय महामार्गावरून दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर वेगाने वाहनांची ये-जा सुरू असते. तरी या लांबीतील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यावरील रहदारीस व कामास अडथळा निर्माण होत आहे. मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेषान्वे महामार्गावरील अतिक्रमण काढण्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत.
        तरी या नोटीसीद्वारे आपणास कळविण्यात येते की, सदर रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमण ०७ दिवसाच्या आत आपल्या स्तरावर काढून घेण्यात यावे अन्यथा यानंतर या कार्यालयाकडून अतिक्रमण काढण्यात येईल. यामध्ये आपले नुकसान झाल्यास त्यास शासन जबाबदार राहणार नाही. या कामी आपण अडथळा निर्माण केल्यास आपणा विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments